बाल विज्ञान मेळावा उत्साहात

| खोपोली | प्रतिनिधी |
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संस्थे अंतर्गत खोपोली नगरपरिषद छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

प्रथम संस्थेचे समन्वयक रणजीत वाघमारे, सहकारी अश्‍विनी भगत, पल्लवी वाघमारे, विजय चव्हाण, विजय वानखडे तसेच शाळेचे मुख्यद्यापक मोहन पाटिल सर यांसह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात एकूण 33 विज्ञान प्रदर्शन मॉडल 40 विद्यार्थ्यांनी सादर केले. तर विज्ञान मेळावा पाहण्यासाठी शाळेच्या 190 सहभाग घेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

Exit mobile version