चिपळूण बाजारपेठ दिवाळी सणानिमित्त सजली

| चिपळूण | प्रतिनिधी |

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त चिपळूण शहर बाजारपेठ दिवाळी साहित्याच्या स्टॉलनी पूर्णपणे गजबजली आहे. यात फॅन्सी आकाश कंदील तसेच पणत्या, गडकिल्ले, रंगीबेरंगी रांगोळ्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे यंदा फ्रेम कंदील अधिक पसंतीस उतरू लागला असून यात अनेक वर्षाची परंपरा असलेला चांदणी कंदील मात्र यामधून लुप्त झाला आहे. साहित्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लख्ख प्रकाशाने आसमंत उजळून टाकणारा दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना हा सण साजरा करण्यासाठीचे नियोजन प्रत्येक घराघरात होऊ लागले आहे. यावर्षी शुक्रवारी वसुबारस, सोमवारी नरक चतुर्दशी, मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी बलिप्रतिपदा, गुरुवारी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे दिवाळी सणाची चाहूल लागताच शहर बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या स्टॉल्सची काही दिवसांपासूनच मांडणी करण्यास सुरुवात केली होती. तसे पाहिल्यास स्थानिक व्यावसायिक दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू या पुणे, मुंबई, कोल्हापूर ठिकाणाहून खरेदी करुन विक्रीसाठी येथे आणतात.

गड किल्ल्यांवर मावळे सज्ज
दिवाळी सणानिमित अनेक वीरगड मातीचे गडकिल्ले बांधण्याची परंपरा दगड-मातीचे गड किल्ले बांधून ही परंपरा जपली जात आहे. मावळे, तोफा अन्‌‍‍ पुतळे सद्यःस्थितीत शाळा, महाविद्यालयान परीक्षा सुरू असून त्या संपताच किल्ले बांधणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या बांधलेल्या किल्ल्यावर पहारा देण्यासाठी बाजारपेठेत शाडूच्या मातीपासून बनवलेले मावळे, तोफा, तर शिवाजी महाराजांचे पुतळे देखील विक्रीसाठी दाखल झाले आहे.
तयार किल्लेदेखील विक्रीला
यात शाडूच्या मातीपासूनचा तयार किल्ल्यांचादेखील समावेश आहे. मावळे 20 रुपये तर किल्ले अगदी 500, 600 रुपयांत विकले जात आहेत.विक्रीसाठी दाखल झाले आहे.
Exit mobile version