चिपळूणकरांना मिळणार मल्टीस्पेशालिटी आरोग्य सेवा

। चिपळूण । प्रतिनिधी ।
रूग्णांना तत्पर, सर्व सोयी-सुविधायुक्त आणि विश्‍वासार्ह आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी विठाई सेवेत रूजू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूणवासियांच्या झाले आहे. या हॉस्पिटलमुळे मल्टीस्पेशालिटी आरोग्य सेवा मिळणार असून चिपळूणकरांसाठी ही मोठी उपलब्धी आहे, असे गौरवोद्गार आसाम राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन खाडे (भा.प्र.से.) यांनी काढले . शहरातील बुरूमतळी येथे सिद्धीविनायक ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे विठाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी नितीन खाडे यांनी या आरोग्य प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. या हॉस्पिटलचे खाडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ.भास्करराव जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, डॉ.अजय सानप , संचालिका डॉ.बनिता सानप, वर्षाराणी वाघमारे, डॉ.विशाल पुजारी, डॉ.डिंपल पुजारी, डॉ.नागेश वाघमारे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव, नगर सेवक विष्णुपंत चौधर, चाणक्य एज्युकेशन ट्रस्टचे संचालक गिरीष आव्हाड, डीएफओ दीपक खाडे, डॉ.रघुनाथ भोई, आय.एम.ए. चिपळूणचे अध्यक्ष डॉ.अभय मोहिते, डॉ.सतीश देसाई, डॉ.यतीन जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजारी यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती भेट देऊन शाल-सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.संतोष हंकारे, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, डंबे, डाफळे आदी उपस्थित होते. मा.आ.सदानंद चव्हाण, चव्हाण व खेंड विभागप्रमुख अंकुश आवले यांनीही हॉस्पिटला भेट देऊन डॉ.अजय सानप व संचालिका डॉ.वनिता सानप यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version