चिरनेर ही रणरागिणीची भूमी; आ. प्रणिती शिंदे

। उरण । वार्ताहर ।
चिरनेर ही रणरागिणी ची व खेळाडू बरोबर क्रीडा प्रेमी ची भूमी आहे.अशा भूमीतील महिलांना एकसंघ करण्यासाठी तिरंगा पतपेढीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे व चिरनेर, मोठे भोम काँग्रेस कमिटीने क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तिरंगा चषकाचे आयोजन हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.अशा होतकरू, कार्याशी तत्पर असणार्‍या जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे हात बळकट करण्यासाठी चिरनेरच्या रणरागिणी, तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
चिरनेर,मोठे भोम काँग्रेस कमिटीने सालाबादप्रमाणे यंदाही प्रकाश झोतातील तिरंगा चषकाचे आयोजन इंद्रायणी मैदानावर केले. महिलांसाठी हळदीकुंकू तसेच डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन तिरंगा पतपेढीच्या सभागृहात केले होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या चारुलता टोकल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव बि.एम.संदिप, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, प्रदेश सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ मनिष पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्षा रेखाताई घरत, मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, चेअरमन अलंकार परदेशी,व्हा चेअरमन सूनील नारंगीकर,युवा अध्यक्ष राजेंद्र भगत,माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, पंचायत समितीच्या मा सदस्य यशोदा परदेशी, घनश्याम पाटील, सचिन घबाडी,मनोज ठाकूर, किशोर केली, महेंद्र ठाकूर सह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेट प्रेमी, महिला वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version