| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावात अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने चिरनेर प्रिमियर लीग (2024) चे आयोजन करण्यात आले आहे. सदर चिरनेर प्रिमियर लीगचा शुभारंभ मंगळवारी (दि.5) मार्च दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही प्रिमियर लीग 5 मार्च ते (दि.7) मार्च या कालावधी दरम्यान चिरनेर येथील मातोश्री मैदानावर डे नाईट खेळविण्यात येणार आहे. दरम्यान या प्रिमियर लीग मध्ये नामांकित खेळाडू, त्यांचे संघमालक, व्यवस्थापक, हितचिंतक, निवेदक, समालोचक आदींनी आपला सहभाग नोंदविला आहे. तसेच या प्रिमियर लीग मधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व क्रिकेट प्रेमींना निमंत्रित करण्यात आले आहे. विशेषता अभिनव सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून या प्रिमियर लीगची संपूर्ण पूर्वतयारी झाली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.