चित्रा… यशाची शिखरं अशीच गाठत जा!

मीनाक्षीताई पाटील

रायगड जि.प.च्या माजी अर्थ, बांधकाम सभापती चित्रा पाटील यांना नुकताच प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पीस पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्या सासूबाई आणि माजी राज्यमंत्री मीनाक्षी ताई पाटील यांनी पत्राद्वारे केलेले कौतुक.

चि.सौ.चित्रास
तुलस नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन…
 नेल्सन मंडेला दक्षिण अफ्रिकेतील  कृष्णवर्णींयावर ब्रिटीशांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढणारे कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ङ्गसंघर्ष करून स्वतःच्या उमेदिची 28 वर्षे तुरूंगवास भोगणारे,  कृष्णवर्णीयांचे मसिहा  नेल्सन मंडेला. त्या काळात ब्रिटिशांकडून तुरूंगात त्यांच्यावर अन्वनित छळ करण्यात आला. पण ते डगमगले नाहीत, आपल्या ध्येयापासून तसू भरही हटले नाहीत. कारण त्यांना ठामपणे माहित होत की दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णिय जनता आपल्या पाठिशी एकमुखाने उभी आहे.
तुरूंगवास भोगून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील जनतेने अक्षरशः दिवाळी साजरी केली आणि दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान फेड्रिक विल्यम यांनी ङ्गङ्घआफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदफफ त्यांना बहाल केले. त्यानंतर 1994 साली दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णिय पंतप्रधान होण्याचा सन्मान त्यांना मिळाला.
नेल्सन मंडेला यांना त्यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिलेल्या योगदानासाठी जगातील सर्वश्रेष्ठ अशा  नोबेल पुरस्कार मिळाला. इतकच नाहीतर आपल्या भारत देशाने देखील त्यांना  भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले. अशा या महान प्रेरणादायी क्रांतीकारक नेत्याच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्काराने तुला सन्मानित करण्यात आलेे. हे समजल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला.कारण ज्या ध्येय धोरणाशी आपल्या घराण्याच्या चार पिढ्या (ना.ना.पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील आणि आता चौथ्या पिढीतील आस्वाद पाटील) झगडत आल्या. समाजाच्या शेवटच्या घटकाच्या उन्नतीचा ज्यांनी सदैव विचार केला. अशा पाटील घराण्याची सून म्हणून तू आपल्या घरात आलीस आणि मी त्याच वेळी तुझ्या हाती  समाजसेेवेचे कंकण बांधले. त्याची प्रचिती तुझ्या प्रत्येक कृतीतून अनुभवायाला मिळाली.
  अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात लोकांचे अतोनात नुकसान झाले. आस्वाद पाटील  च्या बरोबरीने आपत्तीग्रस्तांची विचारपूस करून प्रत्यक्ष पाहणी करून नविन पत्रे तर तू दिलेसच पण तेही कमी पडले म्हणून स्वतःच्या कम्पांऊडचे नविन पत्रे देखील तू काढून दिलेस.महाडला आलेल्या महापूरनंतर मदतीचा ओघ तर सगळीकडूनच आला. परंतु तू त्यातही बारकाईने विचार करून अन्नधान्यासोबतच ते शिजविण्यासाठी लागणारे जिन्नस, महिलांना उपयोगी पडणारे आवश्यक साहित्य तर दिलेच परंतु पुराने सर्वत्र साचलेला मातीचा गाळ उपसण्यासाठी सुद्धा तू पुढाकार घेतलास व स्वतःची गाळ उपसा मशीन सतत कार्यरत ठेवलीस, त्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा टँकरही सतत धावता ठेवलास.   तू आणि तुझ्या ‘झेप’च्या टिमने केलेले काम कौतुकास्पद असेच होते.
कोविड-19 मध्ये सुद्धा  लसीकरणासोबतच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना धीर दिलास. त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करणं कठीण काम होतं. परंतू तू सर्वतोपरी प्रयत्न करुन रुग्णांना अ‍ॅडमिट तर केलंच. त्यांना जीवदान दिलंस .
याच काळात तू 10 हजार मास्कचे वाटप करुन अभियानास्पद कामगिरी केलीस.  अंगणवाडी सेविका, डॉक्टर, नर्स पोलीस यांना सहकार्य तर केलेच परंतू त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली.  सुप्रिम कोर्टाने बचत गटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्यक्षपणे संपूर्ण राज्यात फिरुन त्याचा अभ्यास करुन आपल्या रायगड जिल्ह्यातील बचतगटांना खडतर निविदा प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळवून दिला.  त्यांच्या कच्च्या मालाची उचल करुन, त्यांच्यापर्यंत पोहचवून, त्यांच्यावर प्रक्रिया करुन घेऊन त्यांच्या नावाने पुरवठा केल्यानंतर त्यांच्या हक्काचा मोबदला त्यांना देताना होणारा आनंद मी तुझ्या चेहर्‍यावर पाहिला आहे. समाजातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारी तू, गौरी गणपतीला प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणारी तू; सार्वजनिक दत्तजयंती, हनुमान जयंती अथवा गणपती उत्सवांना हजेरी लावणारी तू, कबड्डी असो वा क्रिकेट सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणारी तू, हिंदू बांधवांच्या सर्व सणांप्रमाणे केवळ निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता प्रतिवर्षी मुस्लिम, बंधुभगिनींना ‘इफ्तार पार्टी’ देणारी तू, या इफ्तार पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे महिलांना सुद्धा सहभागी करुन घेतले जाते. अशी तुझी अनेक रुपे मी बांधलेल्या सामाजिक कंकणामधून अनुभवयास मिळाली. म्हणूनच तू सगळ्यांची आवडी ‘चित्राताई’ आहेस. प्रवाहाविरुद्ध जाऊन काम करणारी तुझी झेप म्हणूनच कौतुकास्पद आहे.
माझ्या अपेक्षेप्रमाणे महिलांना सक्षम करण्यासाठी ‘झेप संस्थेच्या’ मार्फत उत्तुंग भरारी घेतलीस. विविध कार्यक्रम राबवून, विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या पंख्यांना बळ दिलेस. पाककला स्पर्धा असोत वा आई आणि मुलांच्या नात्यातील विण घट्ट करणारी ‘आई असते श्रावण’ हा कार्यक्रम असो. श्रावणमहोत्सवातील तू केलेला नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक प्रकाशन सोहळा असो. ज्याने सारेच भारावून गेले.
समाजातील प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना काकूंच्या नावाने महिला दिनाचे औचित्य साधून दिला जाणारा ‘सुलभा पाटील’ पुरस्कार या पुरस्काराचे आपण मानकरी व्हावे यासाठी समस्त महिला वर्गामध्ये चूरस लागलेली असते. मला अभिमान वाटावा असा ‘आदिवासी महोत्सव’ हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती त्यांच्यातील अनिष्ठ रुढी नष्ट करण्यासाठी शॉर्ट फिल्म तयार करुन त्यांचे केलेले प्रबोधन, त्यांच्यासाठी भरविलेले आरोग्य शिबिर, अपंगांना दिलेला मदतीचा हात, संसारोपयोगी साहित्याचे केलेले शिस्तबद्ध वाटप, मन तृप्त करणारे स्वादिष्ट भोजन तसेच नळाद्वारे दिलेला उसाचा रस हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरले. अलिबाग तालुक्यातील वाघजाई आदिवासीवाडी मधील एका महिलेचा जंगलात काम करीत असताना तिचा एक पाय तुटला होता. ती पुन्हा आपल्या दोन्ही पायांवर परत कधीच उभी राहू शकणार नाही असा ग्रह झाला होता. परंतू चित्राने जेव्हा तिचा कृत्रिम पाय बसवून दिला आणि ती दोन्ही पायांवर उभी राहताच चित्राला कडकडून मिठीच मारली तो क्षण, तो प्रसंग मन भारावून टाकणारा, अंगावर शहारे आणणारा होता. आज ही ती महिला तुला भरभरुन आशीर्वाद देते.
 तुझ्या या सर्व कार्यक्रमामध्ये मानाचा शिरपेच खोवला गेला तो तू आयोजित केल्या गेलेल्या खारेपाट महोत्सवामध्येच. उद्योग, कला, क्रीडा, खाद्य आणि संस्कृती यांचा सुंदर अविष्कार म्हणजे खारेपाट महोत्सव. महिला सक्षमीकरणाची उत्तम कृती म्हणजे खारेपाट महोत्सव.  खारेपाटातील मिठागरे, शेती, आदिवासी लोकांची जीवनशैली आगरी-कोळी संस्कृती, खाद्यपदार्थांची रेलचेल, वारकरी दिंडी, महिलांची बुलेट रॅली, ढोलपथक, रामदास घळीचा देखावा, तुळजाभवानी मातेचे हुबेहूब मंदिर, शिवराज्याभिषेकाचा सोहळा ज्यात स्थानिक 400 हून अधिक कलाकारांचा समावेश. या महोत्सवास   उपस्थित असलेले बलरामजी जाखड, छत्रपतीचे वंशज तंजावरचे बाबाजीराजे भोसले, राष्ट्रवादी  ध्यक्ष शरद पवार, अभिनेत्री निशिगंधा वाड, विजया मेहता इ. मान्यवर आपल्या संपूर्ण परिवारासह येऊन खारेपाट महोत्सवाचे भरभरुन कौतुक केले. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे चित्रा तू महिला सक्षमीकरणाची बीजे खर्‍या अर्थाने या महोत्सवानिमित्ताने रोवलेली दिसून आली. सफाई महिला कामगाराच्या हाती वॉकीटॉकी देऊन तिला आजच्या प्रवाहाबरोबर चालण्याचे सामर्थ्य, धैर्य तू दिलेस.  प्रत्येक कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, त्यात कोणतीही उणीव राहू नये म्हणून तू स्वतः घेतलेली मेहनत आणि म्हणूनच तुझे प्रत्येक कार्यक्रम हे नेत्रदिपक सुंदर, बहारदार वेगळेपण जपणारे ठरले. आणि म्हणूनच मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो.  समाजसेवे बरोबरच राजकारणात तुझी झेप गरुड भरारी ठरली. शेतकरी कामगार पक्षाने तुला दिलेले रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पद त्यांचे तू सोने केलेस. रायगड जिल्ह्याची पहिली महिला अर्थ व बांधकाम सभापती होण्याचा मान तुला मिळाला. आपल्या या पदाचा डोंगरदर्‍यातील, तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कसा फायदा होईल याचाच दादांच्या प्रमाणे (स्व. प्रभाकर पाटील) विचार केलास. तू मांडलेला अब्जोन्नती अर्थसंकल्प हा यापूर्वी मांडलेल्या सर्व अर्थसंकल्पांचा रेकॉर्ड मोडणारा ठरला. मी प्रेक्षक गॅलरीत बसून तुझा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प पहात होते. माझ्या आनंदाश्रूंना पारावारच उरला नाही. क्षणभर वाटलं आज तुझं कौतुक करायला दादा (स्व. प्रभाकर पाटील) असायला हवे होते. पण ती उणीव माझी आई ‘काकू’ हिने भरुन काढली. तुझ्यावर गुलाबपुष्पाचा वर्षाव करुन, कुणालाही अभिमान वाटावा असा मुलगा (आस्वाद पाटील) आणि सून (चित्रा पाटील) मला मिळाली.     म्हणूनच  नंदा म्हणते त्याप्रमाणे ही बेबीची नुसती चित्रा नाही तर ती खर्‍या अर्थाने तिची ‘चैत्रगौरीच’ आहे. चित्रा मनापासून तुझं अभिनंदन! खूप-खूप आशीर्वाद! अशीच यशाची शिखर गाठत जा.
तुझी सासू नव्हे आई
       मीनाक्षी पाटील

Exit mobile version