। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नातून पेझारी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद सेस फंडातून घंटागाडी देण्यात आली. या घंटागाडीचे पूजन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्राजक्ता धीरज म्हात्रे, उपसरपंच मनोज प्रकाश धुमाळ, सदस्य धीरज अशोक म्हात्रे, अमृता सुरज पाटील, अनिता पाटील, ज्येष्ठ कायकर्ते मोहन म्हात्रे, सदानंद पाटील, महेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.