ज्ञानगंगा ट्रस्टचे कार्य पेरणादायी;चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन

| मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

ज्ञानगंगा शिक्षक विद्यार्थी कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सर्व शाळा तसेच या संस्थेचे सभासद असणार्‍या जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये साधारण 250 प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या औचित्याने आपला आहार आणि आरोग्य या विषयावर डॉ भक्ती पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या आरोग्यविषयक प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देऊन शंका समाधानही केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव पिंगळे यांनी प्रास्ताविक करुन संस्था राबवित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षक कल्याणाच्या विविध योजनांचा उपस्थितांना परीचय करुन दिला.

यावेळी अलिबागचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, प्रतिभा पाटील, सुबोध पाटील, अजित हरवडे, प्रमोद भोपी, राजेंद्र म्हात्रे, नरेंद्र गुरव, कार्यकारिणी सदस्य जयवंत वाणी, महेश कवळे, निलेश तुरे, नित्यानंद म्हात्रे, विनायक भोनकर, दयानंद आंजर्लेकर, मनिषा आंजर्लेकर, दीपक पाटील, निलेश वारगे, रवी थळे, विजय गुरव, सुनील पाटील, विनायक पाटील यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक सभासद उपस्थित होते. स्नेहा पाटील, समीक्षा पाटील यांनी ईशस्तवन, स्वागतगीताने प्रारंभ झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश ठाकूर यांनी केले, तर विनायक भोनकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जिल्ह्यातील विद्यार्थी अष्टपैलू आणि संस्कारक्षम बनविण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट करुन, जिल्हा परिषद शिक्षकांचे कौतुक केले. समाजात गरीब श्रीमंत अशी दरी तयार होत असताना , ज्ञानगंगा ट्रस्टचे कार्य गरजू,गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितानाच ट्रस्टसाठी एक लाख रुपयांची भरीव मदत केली.

चित्रलेखा पाटील कार्यवाह
पीएनपी शैक्षणिक संस्था


Exit mobile version