| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रायगड शाखेने जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. अखिल महाराष्ट्रातील शिक्षकांचे आधारवड स्व. शिवाजीराव पाटील यांच्या जयंतीदिनाच्या औचित्याने भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग सभागृहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे निष्ठावान आणि संघप्रिय शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य या विविध विषयात अमूल्य कामगिरी बजावलेले संघाचे शिक्षक, पेण आणि अलिबाग पतपेढीतील विजयी झालेले संचालक शिक्षक या सर्वांना शिक्षकरत्न पुरस्कार, 2023 बहाल करुन सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील अलिबाग, संजय झिराडकर मुरुड, सुधीर शेळके रोहा, पारधी-श्रीवर्धन, जगदीश गुंड-पनवेल, विलास पाटील-पेण, मंगला कुथे -माणगांव, मनिषा आंजर्लेकर-अलिबाग यांच्यासह अनेकांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या नेत्रदीपक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अलिबाग तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद भोपी आणि त्यांच्या अलिबाग टिमने केले.
यावेळी अलिबाग गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, राजेंद्र म्हात्रे, जीवन तेलंगे, नितिन अहिरे, नरेंद्र गुरव, विनोद कवळे, सचिन जाधव, वैभव पिंगळे, जयवंत वाणी, जगदीश म्हात्रे, जयश्री म्हात्रे, निलेश साळवी, धनंजय म्हात्रे, महेश कवळे, उमेश पाटील, विश्वास पाटील, अजित हरवडे, जगन्नाथ पवार, नित्यनाथ म्हात्रे, राजेंद्र पाटील, सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी थळे आणि प्रतिभा पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन विनायक भोनकर यांनी केले.