। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, महाविकास आघाडीच्या अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा मंगळवारी मुरूडमध्ये प्रचार दौरा असणार आहे. दुपारी तीन वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मुरूड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मतदारांना भेटणार आहेत. मंगळवारी (दि. 5) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तळेखार, चोरढे, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वळके, साडेचार वाजण्याच्या सुमारास साळाव, मेढेखार, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोर्लई येथील मनोहर भोपी यांच्या घरासमोरील पटांगण, मांडला तसेच काकळघर येथील लाल गोरमे यांच्या घरासमोर, भोईघर परिसरात मतदारांना भेटणार आहेत. भोईघरबरोबरच काशीद येथील सरोज दिवेकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हा प्रचार दौरा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.