चोंढी – कला शाखेतून मंदार पाटील प्रथम

| अलिबाग । वार्ताहर ।
बारावीच्या लागलेल्या निकालात कला, वाणिज्य व कै. सौ. एस.आर.दातार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चोंढी-किहीमचा एकूण ८५.१३ टक्के निकाल लागला.


यामध्ये कला शाखेतून मंदार नितीन पाटील ६६.५० टक्के प्रथम क्रमांक, दीक्षिता विनीत गोगाटे ६०.०० टक्के दुसरा क्रमांक, ममता उमेश पाटील ५१. १७ टक्के तिसरा क्रमांक, विज्ञान शाखेतून प्रतिभा कृष्णा चौधरी ८२.८३ टक्के प्रथम क्रमांक, भक्ती झडे ७०.३३ टक्के दुसरा क्रमांक, जुही म्हात्रे ६८.५० टक्के तिसरा क्रमांक यांनी पटकविला असून वाणिज्य शाखेतून साक्षी राऊळ ६८.३३ टक्के प्रथम क्रमांक, पुनम मोरे ६४.६७ टक्केदुसरा क्रमांक, सिद्धी दीपक राऊळ ६३.६७ टक्केतिसरा क्रमांक यांनी पटकाविला आहे. कला, वाणिज्य व कै. सौ. एस.आर.दातार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version