। तळा । प्रतिनिधी ।
तळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 96.69 निकाल लागला असून यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये विज्ञान शाखा 100%, वाणिज्य शाखा 97.18% व कला शाखेचा 100% असा एकूण निकाल 96.69 % लागला. यामध्ये कला शाखेतून प्रथम क्रमांक रोहित संदीप माळी (67.50), द्वितीय क्रमांक भावेश अमित आर्डे (66.17) व तृतीय क्रमांक श्रेया गोविंद गोळे (65.50) यांचा आला. वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक श्रावणी दिलीप शिंदे (84.17), द्वितीय क्रमांक सोनल संतोष अडखले (77) व तृतीय क्रमांक मंथन धनाजी मासक (75.50%) यांचा, तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक अनुष्का उत्तरेश्वर सातपुते व भूमिका प्रकाश चौधरी (78.67), द्वितीय क्रमांक सृष्टी दिपक काळे (71.50%) व तृतीय क्रमांक शर्वरी जगदीश शिंदे (67.67) असा लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.






