विचार करून विषय निवडा

जिल्हाधिकारी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापुरात कुभिवली ग्रामपंचयत हद्दीतील विश्‍वनिकेतन इंजिनिरिंग इन्स्टयुटेट महाविद्यालय येथे विद्यालय व मंगलम ऑर्गनिक ली खालापुर यांच्या सहकार्याने क्रिडा संकुल साकारण्यात आले असुन हे संकुल विद्यार्थांना क्रीडा क्षेत्रात मोलाचे ठरणार आहे. या क्रिडा संकुलाचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक विषयाची निवड ही आवडी नुसार आणि भविष्याचा विचार करूनच घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूरचे पोनि अनिल विभूते, मंगलम ऑर्गनिक ली चे वरिष्ठ अधिकारी कमळ दुजाडवाला, पंकज दुजाडवाला, कणीराज, सदानंद तांबोळी, बिनय झा, दत्तात्रेय घरात विश्‍वनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन मधु भतीजा आदी मान्यवर उपस्थित होते.
या विश्‍वनिकेतन महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या क्रीडा संकुलात क्रिकेट खेळण्यासाठी सुविधा त्याच बरोबर टेबल, लॉन टेनिस, स्क्वॅश कोर्ट ही सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी मदत होणार आहे.. या कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे चेरमन मधु भतीजा यांनी मानले.

Exit mobile version