ख्रिस गेल 14000

टी-20 क्रिकेटमध्ये लिहिला नवा इतिहास
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने टी-20 क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात गेलने 38 चेंडूंत 67 धावा केल्या. यादरम्यान गेलने सात षटकार आणि चार चौकार लगावले. नवव्या षटकात अ‍ॅडम झॅम्पांच्या पहिल्या चेंडूवर लाँग ओव्हरवर षटकार ठोकला आणि या मोठ्या शॉट्सह त्याने टी-20 सामन्यामध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

गेलने या सामन्यामध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी -20 क्रिकेटमधील 14,000 धावांचा टप्पा गाठणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी गेलच्या खात्यात 13,971 धावा होत्या. त्याने 67 धावांच्या खेळीसह 14,000 धावांचा टप्पा ओलांडला. गेलच्या शानदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला.

Exit mobile version