रायगडमध्ये पहिल्या फेरीत चुरस

अनंत गीते 17996, सुनील तटकरे 18588

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. नेहुली क्रीडा संकुल येथे मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु आहे. या ठिकाणी सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रथम पोस्टल बॅलेट पेपरवरील मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सहा विधानसभा निहाय मतमोजणी करण्यात आली. इंडिया आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे या दिग्गजांसह अन्य 11 उमेदवारांचे राजकीय भवितव्य 7 मे रोजी मतदान यंत्रात बंद झाले होते. रायगड-रत्नागिरीमधील 60.51 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. रायगड लोकसभा मतदान मोजणीत पहिल्या फेरीत अनंत गीते यांना17996मतं तर सुनील तटकरे यांना 18588 मतं मिळाली आहेत. दोघांन मध्ये चुरशी चा सामना चालू आहे.

Exit mobile version