• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

Antara Parange by Antara Parange
February 11, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नोंदी जतन करण्यात आलेल्या हलगर्जीपणाबद्दल सुनावले
सिडकोला सहा आठवड्यांत निर्णयाचे निर्देश

| चिरनेर | प्रतिनिधी |

सार्वजनिक नोंदी जतन करण्यात झालेल्या गंभीर हलगर्जीपणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने महसूल विभागाच्या भू-संपादन कार्यालयांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‌‘सार्वजनिक नोंदी योग्य रीतीने जतन न करणे, ही सरकारची निष्काळजीपणाची निशाणी आहे,‌’ असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हरवलेला ‌‘अवार्ड‌’ पुन्हा तयार करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, अवार्ड उपलब्ध नसतानाही इतर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे शेतकरी चेतन कांती कुडवकर यांचा अर्ज सहा आठवड्यांत निकाली काढण्याचे निर्देश सिडकोला दिले.

उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात सिडकोने हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र, मोबदला आणि 12.5 टक्के विकसित भूखंड देताना सातत्याने चालढकल होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही भू-संपादन कार्यालयातून ‌‘अवार्ड कॉपी‌’ मिळालेली नाही. “रेकॉर्ड सापडत नाही” अशा तकलादू कारणांमुळे शेतकरी हक्कापासून वंचित राहत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर दापोली-पनवेल येथील सर्व्हे नं. 99/4 मधील 0-15-0 हेक्टर जमीन 1986 मध्ये सिडकोसाठी संपादित झालेल्या कुडवकर यांना अवार्ड न मिळाल्याने 12.5 टक्के विकसित प्लॉटचा लाभ मिळू शकला नाही. अवार्ड कॉपीसाठी 25 वर्षांहून अधिक काळ पायपीट करूनही यश न आल्याने त्यांनी 2023 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयात सादर शपथपत्रात उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) कार्यालयाने अवार्डची मूळ प्रत सापडत नसल्याची कबुली दिली. जुने कागद खोक्यांत ठेवले होते, कोर्टाच्या आदेशाने ते खोके जप्त झाल्याने कागद विखुरले, तसेच स्कॅनिंगसाठी अर्थसाहाय्य नव्हते, अशी कारणे नमूद करण्यात आली. या स्पष्टीकरणावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

न्यायमूर्ती मनीष पितळे आणि श्रीराम व्ही. शिरसाट यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. सिडकोकडेही अवार्डची प्रत पाठवली असल्याने ती शोधण्याचे निर्देश दिले. ‌‘महाराष्ट्र सार्वजनिक नोंदी कायदा, 2005‌’चे उल्लंघन झाल्याचे नमूद करत अवार्ड पुनर्बांधण्याचे आदेश देण्यात आले असून, 16 मार्च 2026 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2025 मध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते-दरे आणि डॉ. नीला गोखले यांनी
‌‘स्कॅनिंगसाठी निधी नाही‌’ या युक्तिवादावर आश्चर्य व्यक्त केले होते, याचाही न्यायालयाने उल्लेख केला.

राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे एका सामान्य शेतकऱ्याला त्याचा कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी तब्बल 38 वर्षे प्रतीक्षा करावी लागल्याचे हे प्रकरण ठळक उदाहरण ठरले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे उरण, पनवेल, नवी मुंबईतील अवार्ड प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर, कामचुकारपणावर पडदा टाकणाऱ्या शासकीय पद्धतींवर न्यायालयाने दिलेला हा चाबूक आहे.

– ॲड. कुणाल नवाळे

Related

Tags: chirnerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Next Post

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
महावितरणच्या हलगर्जी कारभाराने श्रीवर्धनकर त्रस्त
sliderhome

महावितरणच्या हलगर्जी कारभाराने श्रीवर्धनकर त्रस्त

March 27, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?