नवी मुंबई विमानतळावरही अदानीचा कब्जा


विमानतळ उभारणीचा खर्च आता अदानी समूह उचलणार

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीके कंपनीकडे असलेले सर्व अधिकार अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले असल्यामुळे या प्रस्तावित विमानतळाचा 74 टक्के भागधारक म्हणून अदानी समूहाच्या मालकी हक्कावर मसिडकोफने शिक्कामोर्तब केले आहे. मसिडकोफ संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुंबई विमानतळापाठोपाठ नवी मुंबई विमानतळाचे व्यवस्थापनही अदानी समूहाकडे गेले आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित केला जाणारा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील पहिला मग्रीनफिल्ड विमानतळफ असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणार्‍या जीव्हीके समूहाला देण्यास 24 ऑक्टोबर 2017च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्या वेळी प्रकल्पासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असला, तरी भूसंपादनास विलंब झाल्यास खर्च वाढण्यासह विमानोड्डाणासही विलंब होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. चा (एनएमआयएएल) जीव्हीके कंपनीकडे असलेला 74 टक्के भांडवली हिस्सा देशातील सहा विमानतळांच्या व्यवस्थापनाचे कंत्राट असलेल्या मअदानीफकडे गेला असून, 26 टक्के हिस्सा मसिडकोफकडे राहणार आहे. मसिडकोफच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता हा मप्रस्ताव प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड इम्प्लिमेंटेशन कमिटीफ व सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने स्वतःची जमीन दिली असून, विमानतळ उभारणीचा खर्च आता अदानी समूह उचलणार आहे. जीव्हीके आणि सिडको यांच्यातील सवलत कराराच्या शर्ती मअदानीफलाही लागू राहतील. या विमानतळाच्या 1,160 हेक्टरपैकी 99.55 टक्के जमीन जीव्हीकेच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Exit mobile version