पाण्याविना नागरिकांचे हाल

सिडकोकडून पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष
पेण | वार्ताहर |
पेण खारेपाटाला दोन मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. एक म्हणजे, शहापाडा धरण आणि दुसरा म्हणजे तरणखोप येथून हेटवणे धरणाच्या सिडको लाईनवरून. मागील पाच दिवसांपासून सिडकोने पाणी बंद केल्याने वडगाव, उंबर्डे, धोंडपाडा, कोप्रोली, वाशीनाका येथील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. मात्र, स्थानिक आमदार ब्र शब्द काढायला तयार नाहीत. स्थानिक आमदारांनी जनतेला वार्‍यावर सोडले आहे, असेच म्हणावे लागेल.

याविषयी ग्रामीण पाणी पुरवठयाचे अधिकारी राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल की सिडको आपल्याला पाणी द्यायला तयार नाही. त्यांना आपल्या विभागाला पाणी दिल्यास पाणी कमी पडतो. परंतु, ही बाब न समजण्यासारखी असली तरी उन्हाळयात पाणी कमी पडले असते तर मान्य केले असते. पण, पावसाळ्यात सिडकोला पाणी कमी पडतेय, ही गोष्ट पटणे शक्य नाही.
उपअभियंता राजेश हटवारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी दिलेली माहिती ही खूपच बोलकी व अधिकारी व लोकप्रतिनिधींची पोल खोल करणारी होती. कारण, खारेपाट विभागासाठी फक्त एक एम.एल.डी पाणी राखीव आहे. मात्र, जून 2019 पासून आजपर्यंत चार ते 5 एम.एल.डी पाणी खारेपाट विभागात वापरले जाते. तसेच ते यंदा आठ एम.एल.डी पर्यंत वापर केले होते. मार्च 2021 ला झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार रवींद्र पाटील व खारेपाटातील सरपंच हजर होते.

यामध्ये अस ठरवण्यात आल होत की शहापाडा धरण भरल्यानंतर सिडकोने आपला पाणी बंद केला तरी चालेल. याला जिल्हाधिकार्‍यांची व आमदारांची देखील मान्यता होती. अस म्हणन राजेश हटवारे यांच आहे. तसच जवळपास 27 कोटी रूपये एवढा पाण्याचा बिल थकबाकीत आहे अस ही यावेळी सांगण्यात आल आहे. तसच या बैठकीमध्ये जो एक एम.एल.डी पाणी राखीव आहे. त्यापेक्षा कोटा वाढवून घ्यावा जेणे करून पाण्याची कमतरता येणार नाही. मात्र या बैठकी पैकी ना बिल भरला गेला ना पाण्याचा कोटा वाढवला गेला. त्यामुळे आम्ही सिडको ने निर्णय घेतला आहे की खारेपाटाचा पाणी बंद करावा. त्यामुळे खारेपाटाचा पाणी बंद केला आहे. अस राजेश हटवारे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितल.

दोन दिवसापूर्वी मा. आमदार धैर्यशिल पाटील यांनी खारेपाटेचा पाणी पूर्णवत सुरू व्हावा म्हणून हटवारे यांच्याशी बोलणे केले होते. मात्र, स्थानिक आमदार रवी पाटील यांनी मार्च महिन्याच्या बैठकीनंतर एकदाही सिडकोकडे खारेपाटाच्या पाण्याविषयी चर्चा केली नाही. गेली पाच दिवस वडगाव, उंबर्डे, पिंपलपाडा, धोंडपाडा, कोप्रोर्ली या गावांना पाणीपुरवठा होत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. याकडे स्थानिक आमदारांच लक्ष देखील नाही. स्थानिक आमदारांनी जनतेला वार्‍यावर सोडले आहे, असच म्हणाव लागेल.

सिडको पाणी बंद करणार असल्याची माहिती स्थानिक आमदार रविंद्र पाटील यांना होती कारण मार्च महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये सिडकोकडून स्पष्ट सांगण्यात आल होत की शहापाडा धरण भरल्या नंतर सिडकोच पाणी बंद केल जाईल. मात्र त्यावर स्थानिक आमदारांनी कोणत्याच प्रतिक्रिया दिल्या नसल्याने या पाणी बंद ला आमदारांचा छुपा पाठींबा तर नव्हता ना अशी कुजबुज ग्रामस्थांमध्ये होत आहे. कारण गेली पाच दिवसांमध्ये धैर्यशिल पाटील वगळता कोणीही सिडकोला पाणी बंद करण्याविषयी जाब विचारला नाही.

Exit mobile version