शवदाहिनीचा सिडको, पालिकेला विसर

शेकापने प्रशासनाचे वेधले लक्ष

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल पालिका आणि सिडको यांच्या हस्तांतर वादात करोडो रुपये खर्च करून बांधलेली विद्युत शवदाहिनी वापर नसल्याने पडून आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाने निवेदन देत दोन्ही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सिडको आणि पनवेल पालिका केलेल्या कामाची जाहिरात करण्यास व्यस्त असताना कामोठे शहराच्या मध्यवर्ती भागात (से.15) भागात असलेल्या विद्युत शवदाहिनीचा विसर पडल्याचा आरोप शेकापने केला आहे. पर्यावरण समतोल राखावा तसेच आजूबाजूच्या इमारतीमधील रहिवाशांनादेखील धुराचा होणारा त्रास लक्षात घेऊन सदर विद्युत शवदाहिनी बांधली. तरी दोन्ही प्रशासनाने आजूबाजूच्या राहणार्‍या रहिवाशांचा विचार करून सदर विद्युत शवदाहिनी लवकरात लवकर सुरु करावी, अशी विनंती शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे आणि नगरसेवक प्रमोद भगत यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

Exit mobile version