सिडकोचे झिरो पेंडन्सीचे उद्दिष्ट साध्य

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडको महामंडळाकडून व्यवसाय सुलभता पोर्टल मार्फत देण्यात आलेल्या सेवांसंदर्भात शून्य प्रलंबितता (झिरो पेंडन्सी) चे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. व्यवसाय सुलभता मार्फत करून देण्यात आलेल्या सेवांविषयक प्रकरणे जलद गतीने मार्गी लावून सिडकोने शून्य प्रलंबितता साध्य केली आहे. तसेच व्यवसाय सुलभता पोर्टलसंबंधी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी सिडको मार्फत व्यवसाय सुलभता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. ई-प्रशासनाच्या दिशेने सिडकोने टाकलेले हे आणखी एक क्रांतिकारी पाऊल आहे.

या पोर्टलमुळे सिडकोच्या सेवांचे सुलभीकरण, सुसूत्रीकरण डिजिटलायजेशन होऊन सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार, बांधकाम व्यावसायिक, विकासक अशा विविध घटकांना अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवा मिळणार आहे. तसेच झिरो पेंडन्सीचे महत्त्वाचे उद्दिष्टही या पोर्टलद्वारे साध्य करण्यात आले आहे.

डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सर्व ऑनलाइन सेवा एकाच ठिकाणी ‘एक खिडकी निपटारा’ (सिंगल विंडो क्लिअरन्स) उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोतर्फे www.cidcoindia.com/eodb या व्यवसाय सुलभता पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या व्यवसाय सुलभता पोर्टल अंतर्गत वसाहत सेवा (64 दुय्यम सेवा), बांधकाम परवाना सेवा (04 दुय्यम सेवा), अभियांत्रिकी सेवा (03 दुय्यम सेवा), सर्वसाधारण सेवा (04 दुय्यम सेवा) आणि नैना प्रकल्पा संदर्भातील सेवा (04 दुय्यम सेवा) उपलब्ध करून आहेत. तसेच सदर पोर्टलद्वारे नागरिकांना अर्जाची स्थिती आणि सेवा मिळण्यासाठी लागणारा कालावधीही जाणून घेता येणार आहे.

नागरिकांना व्यवसाय सुलभता पोर्टलची माहिती करून देण्याच्या उद्देशाने सिडको भवनच्या प्रवेशद्वारा समोरच व्यवसाय सुलभता कक्षाची सुविधा (इज ऑफ डुइंग बिजनेस सेल) उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिडकोतर्फे या सेवांसाठीचे शुल्क वगळता व्यवसाय सुलभता नागरिकांना वर नमूद केलेल्या सर्व सेवांसाठी अर्ज ऑनलाइन सादर करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच व्यवसाय सुलभता कक्षाची सुविधा सिडकोच्या सर्व नोडल कार्यालयांतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवांसाठी कोणत्याही मध्यस्थ/प्रतिनिधी असल्याचा दावा करणार्‍या व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडता सिडको भवनच्या प्रवेशद्वारा समोरील व्यवसाय कक्षाला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version