। उरण । वार्ताहर ।
आधुनिक शहराचे शिल्पकार अशी ओळख असणार्या सिडकोने उरण चार फाटा सर्कल रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.सिडकोने सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती न घेतल्यास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होऊन अपघात होण्याचा संभव आहे.
सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील परिसराचा कायापालट करण्यासाठी 2019-21 यावर्षी ठेकेदारांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.परंतु सदर परिसरातील विकास कामे ही आजतागायत रेंगाळत पडल्याने त्याचा त्रास हा प्रवाशी, चाकरमान्यांनी, नोकरदार वर्गाला सहन करावा लागत आहे.त्यातच उरण चार फाटा सर्कल रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन अपघातास कारणीभूत ठरु पाहत आहे.
पावसाळ्यापूर्वी उरण चार फाटा सर्कल रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सिडकोने हाती न घेतल्यास पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होऊन अपघात होण्याचा संभव आहे.तरी सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चार फाटा सर्कल रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे.
चार फाटा सर्कल रस्त्याकडे सिडकोचे दुर्लक्ष; पावसाळ्यात साचणार रस्त्यावर पाणी
