जेएनपीए बंदरात पकडली कोट्यवधींची सिगारेट

| उरण | वार्ताहर |

महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करी करण्यात येणाऱ्या सिगारेटचा मोठा साठा पकडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे पाच कोटींहून अधिक आहे. जप्त करण्यात आलेली सिगारेट ही अत्यंत हुशारीने कंटनेरमध्ये लपवली होती.

याबाबतची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली. त्यानंतर संशयित 40 फुटी कंटेनर ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली. तपासणीत या कंटेनरमध्ये चिंचेच्या नावाखाली विदेशी सिगारेटच्या काड्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मोठ्या शिताफीने लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या मालामध्ये 33,92,000 सिगारेट्सचा समावेश आहे. त्याचे बाजार मूल्य सुमारे पाच कोटी 77 लाख इतके आहे. यापूर्वी अनेकवेळा सिगारेट, सोने, नशिली पदार्थ, रक्तचंदन आदींची तस्करी उघड झाली आहे. तरीही जेएनपीए बंदरातून तस्करी जोरात सुरू असल्याचे उघड होत आहे.

Exit mobile version