| महाड | प्रतिनिधी |
रायगड फोटोग्राफर ॲण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशन तसेच महाड फोटोग्राफर ॲण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सिनेमॅटिक व्हिडिओ वेडिंग वर्कशॉप च्यावेळी निकॉन कंपनीचे एक्सपर्ट रंजन झिंगाडे यांनी टेक्निकल डेमो सेशन, हँड्स ऑन एक्सपिरीयन्स, प्रश्नोत्तरे तसेच कॅमेऱ्याचे ॲक्सेसरी सेशन सादर केले. त्याचप्रमाणे निकॉनचे नवीन मिररलेस कॅमेरे व लेन्सेस कसे वापरायचे याबाबत माहिती दिली. या कार्यशाळेला रायगड जिल्हा अध्यक्ष समीर भायदे , दीपक बडगुजर, अनिरुद्ध जोशी, दादा आर्ते, महाड तालुका अध्यक्ष प्रितम सकपाळ, चंदन चव्हाण, विकी सुतार, मंजुनाथ गौडा, तुषार मोकाशी, सुनील पाटणे, प्रशांत राजिवले, चिराग मेहता, कल्पेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.







