| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड पेयाबरोबरच चष्मा, गॉगलसह मफलरचा अधार घेण्याचा प्रयत्न केल जात आहे. होळी संपल्यानंतर उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.
उन्हाळी वातावरण सुरु झाले आहे. दुपारी दोन ते सायंकाळी चार यावेळेत बाहेर पडणेदेखील नकोसे झाले आहे. उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना झळ पोहचू लागली आहे. जिल्हयात सोमवारी 33 अंश सेल्सिअस इतके तापसमान होते. येत्या दोन दिवसात तापमानात दोन अंशाने वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात तापमान वाढत असताना येत्या तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण व हलक्या स्वरुपचा पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना या कालावधीत बाहेर पडताना काळजी घ्यावी. मफलरचा वापर करावा. गॉगलचा वापर करावा. उन्हामुळे चक्कर येण्याची भिती असल्याने सतत पाणी प्यावे. अशक्तपणा निर्माण झाल्यास तात्काळ नजीकच्या दवाखान्यात जाऊन तात्काळ उपचार करावे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
सध्या उष्ण वातावरण आहे. उष्माघाताचा धोका असल्याची भिती आहे. नागरिकांना क्षार व पाण्याचे प्रमाण असलेल्या फळांचा आहार घ्यावा. उन्हात बाहेर पडू नये. उन्हात जास्त काम करू नये. थंड ठिकाणी राहून काम करावे. भरपुर पाणी प्यावे. तसेच चक्कर व अन्य काही लक्षणेआढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
– डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय