। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील थळ येथून विज पुरवठा होणाऱ्या महापारेषणच्या बिघाडाचा फटका संपूर्ण अलिबाग तालुक्याला बसला. रेवसपासून पोयनाड, कुदे, व रेवदंडा पर्यंतची शेकडो गावांना अंधारात राहण्याचा वेळ आली.
आपटामधून थळ येथे महापारेषण विभागामार्फत विज पुरवठा केला जातो .त्यानंतर थळमधून संपूर्ण तालुक्यातील गावांना घरोघरी विज पुरवठा वितरीत होतो. शुक्रवार सायंकाळी थळ येथील 100 के.व्हीच्या महापारेषण विभागाच्या विद्युत सेवेत अचानक बिघाड झाला . या बिघाडाचा फटका अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागासह संपूर्ण शहराला बसला . शहरासह गावांतील वाड्यामधील शेकडो घरे अंधारमय झाली . एक तासात ही सेवा पूर्ववत सुरू होण्याची आशा होती परंतु एक तास उलटूनही विद्यूत सेवा पुर्ववत करण्यास महापारेषण विभाग उदासीन ठरला. पावसाने दडी मारल्याने हवेत गारव्याचा अभाव आहे विद्यूत सेवा बंद असल्याने नागरिकांना नकोसे झाले . लहान मोठ्या व्यवसायिकांना देखील त्याचा फटका बसला .