। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील सांदोशी व आमडोशी गावातील नागरिकांनी स्व. मा. आ. माणिकराव जगताप यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या विचांरावर प्रेरित होऊन रविवारी (दि.27) ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना सुभाष मोरे यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या काळातच सांदोशी खोर्याचा खर्या अर्थाने विकास झाला आहे. विरोधकांनी कितीही थापा मारल्या तरी या गावातील असंख्य ग्रामस्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
महाड तालुक्यातील अनेक गावांचे पक्ष प्रवेश झाले असून विचारांची मशाल पेटणार, विरोधकांची झोप उडणार असल्याचे प्रतिपादन स्नेहल माणिक जगताप यांनी केले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मविआच्या उमेदवार स्नेहल जगताप, महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप, विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, तालुका प्रमुख आशिष फळसकर, तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख सुभाष मोरे, राजुशेठ कोरपे, सरपंच चैतन्य म्हामुणकर, विभाग प्रमुख किशोर सर्कले, विभाग प्रमुख निलेश धुमाळ, तालुका युवासेना अधिकारी प्रफुल धोंडगे, राजू मोरे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बबन डावले, विनोद हिरवे, एकनाथ होगाडे, सचिन होगाडे, रामचंद्र होगाडे, बाळाराम ढेपे, आशिष डावले, सतिष डावले, अमित डावले, अजय हिरवे, सुरेश हिरवे, मानू हिरवे, अनिल हिरवे, कोंडीराम होगाडे, लक्ष्मी होगाडे, दर्शन हिरवे, मनिष चव्हाण, शिवाजी गोरे इत्यादी प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्नेहल जगताप यांच्या विचारांशी प्रेरीत होऊन शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.