| खारेपाट | वार्ताहर |
लायन्स क्लब अलिबाग मांडवा, लायन्स हेल्थ फांऊडेशन अलिबाग, रेवस पाली पदयात्रा मंडळ रेवस गांव, समता फांऊडेशन मुंबई यांच्या सहकार्याने रेवस कोळीवाडा येथे मोफत आरोग्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत डोळयांवर मांस वाढणे, अशा विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात रेवस बोडणी परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. शिबीरात डॉ. अशिष पारधी, प्रतिक कणसे, मनश्री थळे, प्रचिती किणी, कमलाकर पाटील, लायन्स अभिजित गुरव, प्रिती पाटील, बी. एन. भरत असरानी, सुबोध राऊत, मच्छींद्र पाटील, धर्मा कोळी, नवनाथ कोळी, हरेश्वर कोळी, पांडुरंग कोळी, अनंत कोळी, गजानन कोळी उपस्थित होते.