मॅरेथॉन स्पर्धेला कर्जतकरांचा प्रतिसाद

 600 आबालवृद्ध धावले

| कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अंतर्गत कर्जत शहरामध्ये मॅरेथॉन- 2023  ‘एक धाव स्वच्छतेसाठी’चे आयोजन केले होते. सहा गटात ही स्पर्धा आयोजित केली होती. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 600 अबालवृद्धांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्जत शहराच्या इतिहासात ही पहिली मॅरेथॉन स्पर्धा ठरली.

नगरपरिषदेने रोटरी क्लब कर्जत, जेष्ठ नागरिक संस्था, उत्कर्ष इव्हेंट, संस्कार भारती, एसबीआय लाईफ यांच्या सहकार्याने मॅरेथॉन- 2023 या स्पर्धेचे आयोजन केले होते. 15 वर्षांवरील स्पर्धकांचा पुरुष खुला गट, महिलांचा खुला गट, 14 वर्षांखालील मुलांचा व मुलींचा गट, जेष्ठ नागरिक पुरुष व महिला गट अशी ही स्पर्धा होती. आठ किलोमीटर, चार किलोमीटर, दोन किलोमीटर अशा अंतराची ही स्पर्धा होती. कर्जत नगरपरिषद कार्यालया समोरून ही स्पर्धा सुरू होऊन पुन्हा तेथेच स्पर्धेचा शेवट करण्यात येणार होता.

सुरुवातीला सर्व उपस्थितांना स्वच्छतेची व हरित शपथ देण्यात आली. त्यानंतर  नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळ विवेक दांडेकर, हेमंत ठाणगे, संचिता पाटील, प्राची डेरवणकर आदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विविध गटांच्या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 7 ते 75  वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, खो खो च्या राष्ट्रीय खेळाडू मुक्ता झरेकर सुद्धा धावल्या. या स्पर्धेसाठी अमित विचारे,  समीर शिंदे, स्वप्निल नामदास,  दीपक राणा, कौस्तुभ कदम, दिनेश भुसारी, प्रणित निमने यांनी रेफ्री  आणि पायलट म्हणून काम केले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन उत्कर्ष इव्हेंटचे प्रदीप गोगटे यांनी खास शैलीत करून स्पर्धेत रंगत आणली. नगराध्यक्ष जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी रोटरी क्लबच्या वतीने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे, जितेंद्र ओसवाल, सुनील सोनी, दीपचंद ओसवाल, जितेंद्र परमार, अरविंद जैन, हुसेन जमाली, डॉ. प्रेमचंद जैन, डॉ. बी. एल. पाटील, जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, संस्कार भारतीचे पांडुरंग गरवारे, केतन जोशी, एसबीआय लाईफचे विकास व्यवस्थापक समीर भोईर, उत्तम पाटील, प्रकाश नगरकर, प्रभाकर करंजकर, मुकुंद भागवत, प्रा. प्रकाश नाखाडे, संदीप पाटील आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल –
14 वर्षांखालील मुले गट- प्रथम क्रमांक : लोकेश आडे ( 5 हजार 555), रुपये द्वितीय : आयुष नाकाडे (3 हजार 333 रुपये), तृतीय : पोरोमित खरात (1 हजार 111 रुपये) सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
14 वर्षांखालील मुली गट- प्रथम : दिव्या राणा (5 हजार 555 रुपये ), द्वितीय : बेला घरत (3 हजार 333 रुपये),  तृतीय : गायत्री बडेकर (1 हजार 111 रुपये) सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
15 वर्षांवरील पुरुष खुला गट- प्रथम : शिरीष पवार (11 हजार 111 रुपये),  द्वितीय : मयूर भोईर (7 हजार 777 रुपये), तृतीय : पवन प्रजापती (5 हजार 555 रुपये ) समानचिन्ह व प्रशस्तीपत्र
15 वर्षांवरील महिला खुला गट- प्रथम : प्रगती पाटील (11 हजार 111 रुपये),  द्वितीय : तन्वी मरागजे (7 हजार 777 रुपये), तृतीय : धनश्री जोशी (5 हजार 555 रुपये) सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
जेष्ठ नागरिक पुरुष गट- प्रथम : बळीराम भालेराव, द्वितीय : दीपक देशमुख, तृतीय : श्रीराम गांगल यांना गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ नागरिक महिला गट- प्रथम : चारुशीला पिसाट, द्वितीय : सायली कुंभार, तृतीय मुक्ता झरेकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version