एमजेपीच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांना त्रास

| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नळ जोडणीची कामे मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. सदर कामाचा ठेका संपलेला असतानासुध्दा ही कामे संथगतीने अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. ज्या ज्या ठिकाणी ही नळ जोडणीची कामे करण्यात आली आहेत, त्याठिकाणी असलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदल्यामुळे रस्त्यांना खड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठेकेदाराने काढलेले ब्लॉक पुन्हा बसविले नसल्यामुळे सर्वत्र बकालपणा आणि अस्वच्छता दिसून येत आहे. चालताना अनेकदा अपघात होत आहेत.

एकीकडे नगरपरिषदेकडून एखाद्याला नळ कनेक्शन घ्यावयाचे असल्यास अनामत रक्कम भरावी लागते त्यानंतर ना हरकत दाखला देण्यात येतो; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कामातील ठेकेदाराने काही अनामत रक्कम जमा केली आहे की नाही याबाबत गावात चर्चा सुरू असून, अशाप्रकारे कामांचा दर्जा असताना नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाकडून काहीही हालचाली होताना दिसून येत नाहीत की तत्कालीन लोकप्रतिनिधीनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदारांना याबाबत नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने समज देऊन चांगल्या पद्धतीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून पेव्हर ब्लॉकचे रस्ते हे सुस्थितीत राहतील आणि परिसर स्वच्छ राहू शकतो यावर अंकुश राहण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांची नेमणूक एमजेपीने करावी, असे स्थानिक नागरिक बोलत आहेत.

सार्वजनिक शौचालयात जाताना, पर्यटकांना या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे. तेंव्हा एमजेपीने पाण्याची नवीन लाईन टाकताना व कर्जत येथील ठेकेदारने या विभागातल रस्त्यावरील काढले ब्लॉक तत्कालीन लोकप्रतिनिधीनी नगरपरिषदेच्या मार्फत पूर्ववत लवकर बसवावेत. जनार्दन पार्टे, माहिती अधिकार कार्यकर्ते, माथेरान शहर

जनार्दन पार्टे, माहिती अधिकार कार्यकर्ते, माथेरान शहर
Exit mobile version