महावितरणचा गलथान कारभार उघड
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मागील दोन दिवसापासून दिवसातून आठ ते दहा वेळा तशीच रात्री सात ते आठ वेळा बत्ती गुल होत असल्याने शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका, झेरॉक्स सेंटर, घरगुती वीज ग्राहक प्रभावीत झाले आहे. सामान्य जनता विद्युत विभागाच्या या हलगर्जीपणामुळे चांगलीच त्रस्त झाली आहे.
वीज गेल्यावर नागरिक विद्युत कंपनीच्या अधिकार्यांना फोन लावून बेजार होतात. मात्र नागरिकांचा फोन कोणताही अधिकारी वा कर्मचारी उचलत नाहीत. मात्र, नागरिकांकडे असलेले वीज बिल वसुली करीता अधिकारी मात्र तगादा लावतात. वहीज बिल न भरल्यास त्यांची लाईन बंद करण्यात येते. शहरातच नव्हेतर संपुर्ण तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचा नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे.
त्यामुळे नागरिकांच्या या असंतोषाचा भडका मात्र कधीही उडू शकतो याकडे वेळीच वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे? शहरांमध्ये सध्या आघोशित भारनियमन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रात्रीला आणि दिवसा सुद्धा अनेकदा विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कुठेही भारनियमन नसताना जून्या शहरातच वीज कंपनी वीज पुरवठा का खंडीत करते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज प्रवाह वारंवार खंडित का होत आहे याबाबत माहिती घेण्याकरिता काल दि. 24 एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क झाला नाही तर आज दि. 25 एप्रिल रोजी त्यांचा भ्रमणध्वनी स्विच ऑफ होता