संत निरंकारी मिशनचा रायगडात नागरी वृक्ष समूह

वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ
दिघी | वार्ताहर |
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या हस्ते वननेस-वन नामक या परियोजनेचा शुभारंभ करण्यात आला. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियान सुरू करण्यात आला. या अभियानात जिल्ह्यातील पेण, अलिबाग व म्हसळा येथे रोप लागवड करण्यात आली.

वृक्षदेखील आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांचे समूह लावण्यात येतील. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील.
माता सुदीक्षाजी,निरंकारी समुह

या परियोजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील म्हसळा, पेण व अलिबाग याठिकाणी येथे 200 इतकी झाडे लावण्यात आली आहेत. म्हसळा येथील रोप लागवडी प्रसंगी म्हसळा नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिर्डे, वडवली ब्रँचचे मुखी गणेश नाक्ती, हिरामण चव्हाण उपस्थित होते. त्यांनी वननेस-वन अभियानाची स्तुती करत असतानाच मिशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे व मानवतावादी आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. वृक्षारोपण करण्यासाठी मिशनचे रायगड 40 अ चे क्षेत्रीय प्रबंधक प्रकाश म्हात्रे, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक प्रविण पाटील तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणाचे कार्य पार पाडले.

दीड लाख रोप लागवड –
संपूर्ण भारतातील 22 राज्यांच्या 280 शहरांमध्ये निवडक 350 ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे 1,50,000 रोपांची लागवड करण्यात आली. येत्या काळात या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version