आठ जणांवर गुन्हा दाखल
। नेरळ । वार्ताहर ।
श्रीराम चौकात दरवर्षी दसरा म्हणजे विजयादशमी या सणाला घोड्यांची शोभायात्रा काढली जाते. बुधवारी (दि.5) दसरा सण साजरा करण्यासाठी दस्तुरी नाका येथील अश्वपाल या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी सायंकाळी पावणे पाच वाजता दोन अश्वपाल संघटनांचे कार्यकर्ते घोड्याचा पाय आमच्या घोड्याला का लागला? अशा शुल्लक कारणावरून एकमेकांना भिडले. काही कालावधीतच हे प्रकरण हाणामारीवर गेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एकमेकांना हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे
.
पोलीसांनी एका गटाचे पाच आणि दुसर्या गटाचे तीन अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई दामोदर खेतले हे या गुन्ह्याचे फिर्यादी असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे या हाणामारी प्रकरणाचा अधिक तपास करीत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही