। कोर्लई । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण रायगड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुडमध्ये दि.10 ते दि.14 ऑक्टोबर या कालावधीत मोफत नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. नयामध्ये नागरी संरक्षणात जीव वाचवण्यासाठी, मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी, उत्पादनात सातत्य राखण्यासाठी, जनतेचे उच्च मनोबल राखणे, मुख्यालय सेवा, संप्रेषण सेवा,वॉर्डन सेवा,अपघाती सेवा,अग्निशमन सेवा, बचाव सेवा, डेपो आणि वाहतूक सेवा, पुरवठा सेवा,बचाव सेवा याचे प्रशिक्षण देणार आहे.
यासाठी तालुक्यातील 18 वर्षे वयावरील युवक व युवतींनी या प्रशिक्षण शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी तुफैल दामाद 9270512858 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.