कचरा टाकण्यावरुन हाणामारी

| रसायनी | वार्ताहर |

तळेगाववाडी गावात कचरा टाकण्यावरुन वाद होवून भाऊबंदकीच्याच दोन गटात हाणामारी झाली. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी आपापली तक्रार नोंद केली आहे. कैलास रमेश मांडे व अभिजित मांडे, आनंद मांडे, सुवर्णा मांडे यांच्यात रुमवरुन जुना वाद आहे. त्यात आता कचरा टाकण्यावरुन वाद होऊन कैलास मांडे यांना अभिजित मांडे याने हाताबुक्यांनी मारहाण केली. कैलासनेही रागाच्या भरात अजित मांडेला बेदम मारहाण केली. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी रसायनी पोलिसात दाखल झालेल्या आहेत. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस खाड्ये अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version