। नागपूर । प्रतिनिधी ।
राज्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पेपर सुरू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारल्याचा प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये या हल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरमधील किदवई हाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज एका शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर दुसऱ्या एका शिक्षकाने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये राडा झाला. सगीर अहमद असे जखमी झालेल्या मराठी विषयाच्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून, त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच हाणामारी
