अलिबाग बस स्थानकासमोर तुंबळ मारामारी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग बस स्थानकासमोरील जय माता दी स्नॅक्स दुकानात कामाला असलेला परप्रांतीय व ग्राहकामध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर मारामारीत झाले. विक्रेता व ग्राहकामध्ये झालेल्या मारामारीमुळे या ठिकाणी काही वेळ गर्दी झाली होती.

काहींनी मध्यस्थी करुन त्यांना पोलीस ठाण्यात नेले. सध्या अलिबाग पोलीस ठाण्यात हे प्रकरण पोहोचले असून दोघांचीही बाजू पोलिसांनी ऐकून घेतली. याप्रकरणी अद्याप कोणत्याही तक्रारीची नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.

Exit mobile version