श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धनमधील रविंद्र ना. राऊत माध्य. शाळेचे सर्व वर्ग सोमवारपासून नियमित सुरु करण्यात आले. मुख्याध्यापक र. सि. ढाकणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या शाळेचे इ 10 वी चे वर्ग 12 आॉगस्ट,12 वी चे वर्ग 30 आॉगस्ट तर. 5 वी ते 9 वीचे वर्ग 16 सप्टेंबर आणि इ. 11 वी चे वर्ग आज दि. 4 आॉक्टोबरपासून नियमितपणे सुरू झाले आहेत.
सर्व वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व पालकांची संमत्ती पत्रके घेण्यात आली होती. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून कोविडप्रतिबंधक लसीचे दोन-दोन डोसही घेऊन झाले आहेत. शाळा सुटल्यावर सर्व वर्गांतील बेंचेसचे स्प्रेद्वारे दररोज सॅनिटायझेशन केले जाते. प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीचे दररोज शाळेत प्रवेश करतांना सॅनिटायझेशन केले जाते व थर्मल गनद्वारे तापमानही पाहिले जाते. वर्गात बसवितांना एका बेंचवर एक या प्रमाणेच विद्यार्थी बसविले जातात. तेही एक दिवस मुलींचे आणि एक दिवस मुलांचे वर्ग घेतले जातात असे नियोजन करण्यात आले आहे. शाळेमध्ये व वर्गामध्येही सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नाका-तोंडावर मास्क लावलेले दिसून आले. शाळा सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांची दररोज सुमारे 80 ते 85 टक्के उपस्थिती असते असे समजले.