| पनवेल | वार्ताहर |
नागपंचमी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी असल्याने नागपंचमी निमित्त पूजेसाठी पारंपरिक मातीचे रंगीत पिवळे नाग पनवेलमधील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत. नागपंचमी दिवशी नागाची पूजा महिला करीत असतात. या दिवशी पारंपरिक मातीच्या नागाची पूजा केली जाते. रंगीत पिवळे आणि त्यावर सुंदर रेखीव टिपके असलेले सुंदर नाग महिलांना आकर्षित करीत आहेत. पनवेलमधील बाजारपेठेत कर्नाळा चौक, मार्केट यार्ड, टपालनाका मिर्चीगल्ली आदी ठिकाणी मातीचे नाग विकावयास आले आहे. मोठे नाग 100 रुपयास, मध्यम 50 रुपये व लहान 25 रुपये अशा दराने विक्री होत असल्याची माहिती नागविक्रेत्यांनी दिली.