स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग ; जागतिक पृथ्वी दिन

। अलिबाग । वार्ताहर ।
नगर परिषद अलिबाग, इकोसत्व सोल्युशन, द इनक्युबेशन नेटवर्क, सेकंड म्युस व व्हीडीके यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ या अभियानांतर्गत नुकताच जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यात आला.
जागतिक वसुंधरा तथा पृथ्वी दिनाचे औचित्य साधून रामनाथ रोड शिवशक्ती अपार्टमेंटच्या बाजूला असलेला डम्पिंग पॉईंटवर रांगोळीच्या माध्यमातून व वृक्षलागवड करून सुशोभिकरण करण्यात आले आणि डम्पिंग पॉईंट बंद करण्यात आला. यावेळी इकोसत्वचे टीम लीडर राहुल निकम यांनी पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा पंचतत्त्वे यांचे महत्त्व तसेच कचरा उघड्यावर न टाकता नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये चार प्रकारे कचरा वर्गीकरण करूनच देण्यात यावा. याद्वारे परिसर, आपले शहर, पृथ्वी स्वच्छ सुंदर निरोगी ठेवण्याकरिता सहकार्य करावे म्हणून माहिती दिली व उपस्थितांकडून याकरिता शपथ घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख नामदेव जाधव, सुपरवायझर प्रकाश तांबे, नगर परिषदेचे राहुल गायकवाड, व्हीडीके कर्मचारी, इकोसत्व टीम लीडर नदीम खान, प्रतिनिधी मल्हारी पंडित, रेश्मा ढावरे, पूजा पिंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version