ताकवलीकरांसाठी स्वच्छ, सुरक्षित पाणी

पंचायत समिती व गोदरेजचा संयुक्त उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सामाजिक पाणी विकास उपक्रमाचा भाग म्हणून वॉटर ऑर्गनायजेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वाडवळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताकवली गावात गोदरेज अँड बॉइसच्या माध्यमातून सहा पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे 210 लाख लीटर पाणी साठवणुकीची क्षमता तयार केली. यामुळे येथील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळण्याबरोबरच पाणीटंचाईचा प्रश्‍न कायमचा निकाली लागला आहे. याआधी, समाजाला सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्रामधील वडवळ आणि तांबाटी या गावांमध्ये कंपनीने पाच पाण्याच्या टाक्या बसवल्या होत्या. या पाण्याच्या टाक्यांमुळे समाजाच्या आरोग्य समस्या सुधारण्यासाठीच मदत होत नाही तर त्यामुळे घरात स्वच्छता सुद्धा येते, प्रदुषित पाण्याच्या स्त्रोतामधून अनेक मैल अंतर पार करून पाणी आणण्यासाठी जावे लागत असलेल्या महिलांसाठी हे वरदानच ठरले आहे.


यावेळी सीएसआर आणि सस्टेनेबिलीटीचे प्रमुख अश्‍विनी देवदेशमुख म्हणाल्या, शाश्‍वत आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने आमच्या वचनबद्धतेसह, गोदरेज अँड बॉइस समाजामध्ये पुरेसा पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीने कार्य करत आहे. पाणी उपलब्धता वाढवणे, समाजाला पाण्याची उपलब्धता करून देणे, पाण्याचा दर्जा सुधारणे अशा तिन्ही बाजूंकडे या प्रकल्पाच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत आम्ही सहा पाण्याच्या टाक्या, चार चेक डॅम बांधले, ज्यामुळे समाजासाठी सुरक्षित 210 लाख लीटर पाण्याची उपलब्धता झाली आणि खालापूर भागात पावसाचे पाणी जमा होणे आणि ते झिरपणे याचीसुद्धा निश्‍चिती झाली आहे. हे सर्व प्रकल्प ग्राम पंचायती आणि स्थानिक घर यांच्या कृतिशील सहकार्य आणि सहभाग यांची एकत्रित मेहनत असल्याचे अश्‍विनी देवदेशमुख यांनी सांगितले.

उपक्रमाचे फायदे
पाणी गोळा करणे, जमिनीतील पाण्याचा स्तर सुधारणे, अस्तित्वात असलेले जलसाठ्यांचा जिर्णोद्धार आणि सुधार, वर्तमान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता जलसाठा बांधणे, पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठी पाणी शुद्धीकरण करणे, पाणी वितरण प्रणाली तयार करणे या गोष्टी शक्य होतात.

Exit mobile version