टँकरची कारला धडक; क्लिनरचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।

पुणे-दिघी महामार्गावर टँकरने कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात टँकर क्लिनरचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार जलाल खान हे त्याच्या मालकीची टाटा कंपनीची कार (क्र. एम एच 46 एफ 2389) घेऊन महाड येथून पुणे येथे जात होते. दरम्यान सणसवाडी गावच्या हद्दीतील टी पॉइंट येथे थांबले होते. पुन्हा गाडी चालू करुन पुणे येथे जाण्यासाठी निघत असताना पाठीमागून येणारा टँकर (क्र. एम एच 48 ए.जी.5307) वरील चालक स्वप्निल शिंदे याने जलाल खान यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून टँकरमधील क्लिनर सुशांत अंनत शेळके (वय 39 वर्षे, रा. इंदापुर) याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. निवृती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. किरवले करीत आहेत.

Exit mobile version