शेकापतर्फे स्वच्छता मोहीम

जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा पुढाकार
। नवीन पनवेल । वार्ताहरद ।
आ.बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि.27) खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील सिडकोतर्फे आरक्षित प्लॉट स्वच्छ करून देण्यात आला.
सदर प्लॉटवर साचलेले डेब्रिज आणि वाढलेली झाडी झुडपे साफ करून लहान मुले आणि तरुणांसाठी खेळाचे मैदान करून देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष योगेश कोठेकर यांनी केले होते. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी अध्यक्ष अनिल बंडगर, माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे, शेकाप उपाध्यक्ष किरण घरत, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष वैभव गलांडे, शेकाप युवा नेते मंगेश अपराज आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version