चिपळूणमध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानची साफसफाई ; सामाजिक बांधिलकीने नागरिक गहिवरले

। चिपळूण । प्रतिनिधी ।
27 जुलै रोजी महापुराचे अस्मानी संकट आल्यानंतर हजारो कुटुंब नेस्तनाबूद झाले, जागोजागी कचर्‍याचे ढीग, अनेक संसार उध्वस्त सर्वकाही काळजाला थरकाप आणणारे अशावेळी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे शेकडो श्री सदस्य चिपळूण वासियांच्या मदतीसाठी क्शन मोडमध्ये धावून आले. 27 जुलै रोजी रोहा येथील 110 अलिबाग 125, राजापूर 200, सांगली 21,चिपळूण 70 असे तब्बल 551 श्री सदस्य चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचर्‍याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधी, सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले.
यावेळी श्री सदस्यांनी शेकडो टन कचरा उचलल्याने नागरिक गहिवरून गेले.चिपळूण शहरात चार दिवस कचर्‍याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते.यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातून अनेक श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोबतच धूपप्रतिबंधक फवारणी देखील श्री सदस्यांनी केली आहे.हे सर्व श्री सदस्य स्वतःच्या जेवणासह या ठिकाणी तयारीमध्ये उचलताना सोबत सहा डंपर दोन जेसीबी मशीन घेऊन कचरा साफ करताना दिसत होते. या सर्व श्री सदस्यांनी चिपळूण शहरातील बुरुड तळी ते संपूर्ण बाजारपेठ, बहादूर शेख ते खेर्डी, त्याच प्रमाणे बाजारपेठ ते पेठमाप,शंकरवाडी ते मुरादपुर अशा चिपळूण शहरातील आणि उपनगरातील सर्व ठिकाणचा कचरा मोठ्या प्रमाणात उचलण्याचे काम करताना सामाजिक बांधिलकी चे उत्तम उदाहरण दाखवून दिले.याबाबत शहरातील सर्व नागरिकांनी या सर्व श्री सदस्यांचे आभार व्यक्त केले. त्याचसोबत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या शिकवणी बद्दल आदर व्यक्त केले.

Exit mobile version