श्री शिवभक्त मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील मजगावच्या श्री शिवभक्त मित्र मंडळातर्फे किल्ले पद्मदुर्ग स्वच्छता मोहीम रविवारी आयोजित करण्यात आली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची निर्मिती का व कशासाठी केली? पद्मदुर्ग का निर्माण केला होता ? किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण इमारती व त्यांचे स्थान व शिवकालीन शिवकालीन विज्ञान याचे महत्त्व जाणून घेणे आदी संदर्भात सर्व शिवभक्त शिवप्रेमी गडप्रेमी यांना या किल्ल्यावरची ऐतिहासिक माहिती स्वच्छतेसाठी आलेल्या शिवभक्तांना यावेळी देण्यात आली. पद्मदुर्गातील सर्व कचरा व प्लास्टिक या सर्वांनी गोळा केला. श्री शिवभक्त मित्र मंडळातील सर्व सदस्यांसह अन्य शिवभक्त यावेळीउपस्थित होते.यात शनिकेत भोईर, समीर माळी, आशिष बुल्लू, नितीन मानाजी, योगेश घरत, राज भोईर, शुभम भोईर, सुबोध पाटील, सार्थक शेडगे, अनंत निरकर व इतर सदस्य उपस्थित होते तसेच शिवकन्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.