सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे गडकोटांची स्वच्छता

| चिपळूण । प्रतिनिधी ।

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवछत्रपतीच्या गडकोटांवर सह्याद्री प्रतिष्ठानकडून मोहिमा राबवून अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील किल्ले रसाळगड, किल्ले मंडणगड, किल्ले पालगड, किल्ले गोवागड, किल्ले बाणकोट या किल्ल्यांवर प्रतिष्ठानकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. प्रथम गडकोटांचे पूजन करण्यात आले. तसेच गडावरील तोफा, चुन्याचा घाणा येथील गवत काढून सभोवताली परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत किल्ल्यावरील दरवाजे, तटबंदी आदी ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करून अनोखा स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. जमा केलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली तसेच किल्ल्यावर राष्ट्रध्वजही फडकवण्यात आला. रसाळगड मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version