काशिदमधील विहीरींची साफसफाई

जय हनुमान क्रिकेट संघाचा उपक्रम; ग्रामस्थांनी मानले आभार
। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील काशिद येथील जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने सर्व युवकांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची साफसफाई केली आणि गावात नव्याने बांधण्यात येत असलेल्या हनुमान मंदीर निर्माणसाठी पंचवीस हजारांची देणगी देऊन आपला खारीचा वाटा उचलल्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. काशिद येथील जय हनुमान क्रिकेट संघातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग एक गाव, एकजूट, स्वच्छतेची कास धरून सर्व युवकांनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरींची साफसफाई करून स्वच्छ शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून जय हनुमान मंदीर ट्रस्ट ला मंदिर उभारण्यासाठी पंचवीस हजारांची देणगी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सुर्यकांत जंगम यांनी युवकांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version