मदगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिम

। म्हसळा । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे (बोर्ली) येथील दुर्लक्षित वनदुर्ग मदगड किल्ल्याची दिवसेंदिवस दुरावस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून व स्थानिक प्रशासनाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या मदगड किल्ल्यावर नुकतेच श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्थानिक दुर्गमित्रांनी गवत काढणी व साफसफाईची श्रमदान मोहीम पार पाडली. मोहीमेमध्ये युवकांकडून गडावर काही ठिकाणी दिशा आणि वास्तु अवशेष फलक उभारण्यात आले.
यावेळी श्री शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रतिक भायदे, निखिल पयेर, अंकीत नाक्ती, जयदीप बुधे, सागर बिराडी, नितेश पांडव व अन्य 15 युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या युवकांनी वाड्या अवशेषांजवळील साफसफाई केली. मदगड संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून महिन्यातील एक दिवस श्रमदान मोहीम प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येणार आसल्याचे यावेळी भायदे यानी सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या भागातील पर्यटनात वाढ होण्यासाठी मदगड किल्ल्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
महेश चौलकर, गड किल्ले आभ्यासक

Exit mobile version