तळगडावर स्वच्छता मोहीम

। तळा । वार्ताहर ।

इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान तर्फे किल्ले तळगड येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस शिवाजीराव बापमारे पाटील यांनी समस्त शिवभक्तांना मार्गदर्शन केले. सुरवातीला गडावर तटबंदी जवळ असणारे गवत, झाड तटबंदीला धोका निर्माण करत होती ती काढण्यात आली.या मोहिमेसाठी सांगली, सातारा, पुणे, जालना, सोलापूर, मुंबई,अकोला,जालना, छत्रपती संभाजी नगर अशा अनेक जिल्ह्यातून शिवभक्त आले होते. तसेच सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानच्या सचिव अस्मिता डिसले, उपाध्यक्ष वैभव माने, कार्याध्यक्ष श्याम नानोटे यांनी विशेष सहकार्य केले.

Exit mobile version