। उरण । वार्ताहर ।
बहराई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील श्री एकवीरा देवी मंदिर, वेश्वी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत म्हणजे साधारण पाच तास चाललेल्या स्वच्छतेदरम्यान, तिथून जमा केलेल्या कचर्यात प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक होते.
श्री एकविरा मंदिर वेश्वी किंवा अशा कोणत्याही ठिकाणी आनंद अनुभवण्यासाठी जाताना आपलं निसर्गभान जागृत ठेवून, तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला आपल्याकडून कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे, हाच संदेश बहराई फाऊंडेशनने आपल्या कृतीतून समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी श्रमदान करण्यासाठी अंकिता ठाकूर, रामनाथ पाटील, महेश पालकर, विशाल ठाकूर, दौलत पाटील, तुषार पाटील, सुरेंद्र पाटील, वैभव पाटील आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माणूस श्रद्धेनं आपल्या मनःशांतीसाठी किंवा निवांतपणासाठी अशा पवित्र ठिकाणी गेल्यावर तिथे कचरा करून परतणार असेल तर अशा समाजाला प्रबोधनसोबतच आत्मपरीक्षणाचीदेखील नितांत गरज आहे.
– वैभव पाटील सचिव, बहराई फाऊंडेशन