धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छ्ता अभियान

| पनवेल । वार्ताहर ।
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (2 ) रोजी महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. सकाळी सात वाजता सर्व श्री सदस्य स्वयं स्फूर्तीने उपस्थित होते. 7.30 वाचता अभियानास सुरवात झाली यात 500 हून अधिक श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला त्यावेळी हॉस्पिटलमधील भिंती स्वच्छता, पंखे, लाद्या, परिसर स्वच्छ करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानतर्फे, साफ सफाईसाठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात आले.

Exit mobile version